Crime
sakal
किरकोळ वादाचा जाब विचारल्याने युवकाने दोघांच्या पोटात चाकू भोसकल्याची घटना नांदेड शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. यात एकाचा मृत्यू झाला; तर दुसरा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर फरारी झालेल्या आरोपी युवकाची कोणालाही काहीही माहिती नव्हती. विमानतळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी शोधमोहीम राबवत गुन्ह्याची उकल केली.