Milk Demand During Kojagiri Pournima
sakal
जुने नाशिक: कोजागरी पौर्णिमेनिमित्त दुधाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. प्रमुख विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण शहरभरात सुमारे दहा हजार लिटरने मागणी वाढली आहे. त्यामुळे दरातही वाढ झाली आहे. रविवारी ८५ रुपये लिटरने दूध विक्री झाले असले तरी सोमवारी प्रति लिटर शंभर रुपये दूध विक्री होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.