Village Development
sakal
नाशिक: भार्डी (ता. नांदगाव) ग्रामपंचायतीचे विभाजन करून कोंढार हे गाव स्वतंत्र करण्यात आले. पण, गावाच्या सातबाऱ्यावर ‘ग्रुप ग्रामपंचायत भार्डी’ असाच उल्लेख कायम होता. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसत होती. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या प्रकरणाची दखल घेत कोंढारच्या सातबाऱ्यावरील ‘भार्डी’ नाव कमी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महसूल यंत्रणेने आवश्यक नोंदी घेऊन बदल केले. त्यामुळे कोंढारकरांना पन्नास वर्षांनंतर स्वतःची ओळख प्राप्त झाली.