नाशिक: गोदावरी-मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळांतर्गत ‘कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प’ कार्यालय नाशिक येथे सुरू करण्यात येत आहे. रविवारी (ता. ३) दुपारी दोनला सिंचन भवन परिसरात या कार्यालयाचे उद्घाटन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होईल. मंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी असतील.