नांदगाव तालुक्यात कृषी संजीवनी मोहिम

Taluka Agriculture Officer Jagdish Patil giving practical
Taluka Agriculture Officer Jagdish Patil giving practicalesakal

बाणगाव बुद्रुक/ नांदगाव (जि. नाशिक) : शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर तंत्रज्ञान (Technology) पोहचविणे व उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने नांदगाव तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह आज (ता. २५) पासून सुरू झाला. तालुक्यात १० ते १२ जूनदरम्यान पाऊस झाला आणि त्यानंतर एक पंधरवड्याचा खंड पडला. चिंतेत पडलेल्या शेतकऱ्यांना २३ व २४ जूनच्या पावसाने चांगला दिलासा दिला. तालुक्यात आजपर्यंत १२० मिलिमीटर पाऊस पडला असून, पाचही महसूल मंडळांमध्ये समाधानकारक पाऊस (Rains) झाला आहे. या पावसामुळे सात ते आठ इंचापर्यंत ओल पोहचली असून, पेरणीस समाधानकारक स्थिती आहे. (Krishi Sanjeevani Mohim in Nandgaon taluka Nashik News)

शेतकऱ्यांनी ॲझोटोबॅक्‍टर बायोला या जैविक खतांची बीजप्रक्रिया करून पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत कासार, शेतकरी सल्ला समितीचे सदस्य विनायक बोरसे, बाळासाहेब कवडे, आत्मा पुरस्कार विजेते आदर्श शेतकरी आणि नांदगाव तालुक्याचे रिसोर्स पर्सन जयंत जुन्नरे यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचे उद्‌घाटन गंगाधरी येथे करण्यात आले. याप्रसंगी जोडओळ पद्धतीने व ठिबक सिंचनाच्या सहाय्याने लागवड केलेल्या मका पिकाचे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संतुलित रासायनिक खताचा वापर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी सल्ला समितीचे सदस्य बाळासाहेब कवडे यांनी शेतकरी वापरत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल कौतूक केले. अशाच प्रयत्नाने उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन केले.

Taluka Agriculture Officer Jagdish Patil giving practical
दानपेटी चोरीचा 12 तासात छडा

नांदगावचे वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत कासार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. इफको कंपनीचा नॅनो युरिया बाजारात असून, त्याचा वापर शेतकऱ्यांनी फवारणीद्वारे करावा, असे आवाहन कंपनी प्रतिनिधी नितीन उमराणी यांनी केले. कृषी संजीवनी चित्र रथास मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रासायनिक खतांचा संतुलित वापर, खतांमध्ये दहा टक्के बचत या धोरणानुसार जैविक खते, हिरवळीच्या खतांचा वापर, युरियाऐवजी नॅनो युरियाचा वापर करण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रचार करण्यात येत आहे.

Taluka Agriculture Officer Jagdish Patil giving practical
सावधान ! ऑनलाइन पावणे 6 लाखांची फसवणूक

याप्रसंगी गंगाधरीचे सरपंच सचिन जेजूरकर, कृषी सहाय्यक सचिन मोरे, समाधान जाधव, श्री. आव्हाड, धायगुडे, भरत इघे, आशिष भागवत, सुनील खैरनार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आत्माचे कृषीमित्र सुनील खैरनार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com