दानपेटी चोरीचा 12 तासात छडा

Panchavati police arrested suspects
Panchavati police arrested suspectsesakal
Updated on

म्हसरूळ (नाशिक) : पंचवटी शनी चौकातील शनी मंदिराच्या दानपेटी चोरीचा अवघ्या बारा तासात छडा लावण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश आले आहे. ऋदेक कैलास गोस्वामी (२६, फिरस्ता, तपोवन, मूळ रा. कल्याणी टेकपुर, ग्वालियर मध्य प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

Panchavati police arrested suspects
ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या घरावर धाड, कागदपत्रांसह सापडले सोन-चांदी

पंचवटीत शनी चौक येथे अतिप्राचीन शनी मंदिर आहे. शुक्रवारी (ता.२४) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मंदिराची लोखंडी खिडकी तोडून दानपेटी कुलूप तोडून त्यातील जवळपास पंचवीस हजार रुपये चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त जानोरकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची उकल करण्याबाबत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी आदेशित केले होते.

त्यानुसार पंचवटी गुन्हे शोध पथक घटनास्थळी पाहणी केली. या भागात आजूबाजूस असलेले सीसीटिव्ही फुटेज तपासणी केली. त्यानुसार संशयित गोस्वामी यास ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्याच्याकडे दानपेटी चोरीतील रक्कमेपैकी बावीस हजार पाचशे पंचवीस रुपये हस्तगत करण्यात आले. सदर कामगिरी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सीताराम कोल्हे व निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, गुंबाडे, राकेश शिंदे, अविनाश थेटे, अंबादास केदार, कुणाल पचलोरे, राहुल लभडे, कैलास महाले आदींनी बजाविली आहे.

Panchavati police arrested suspects
अंधश्रद्धेच्या आहारी जात तरुणीने कापली स्वतःची जीभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com