Agriculture Exhibition
sakal
नाशिक: वातावरणातील आमूलाग्र बदलाच्या काळात शेती कशी करावी, याचे प्रात्यक्षिक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शेती करण्याचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने होत असलेले ‘कृषिथॉन- २०२५’ हे प्रदर्शन १३ ते १७ नोव्हेंबरदरम्यान ठक्कर डोममध्ये होणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल.