फोटो : H33213, H33214, H33215, H33216
-------------
कृष्णा, ग्रिफीन, एसएसके, क्रीडक गट विजेते
एनडीसीए मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १९ वर्षाआतील वयोगटातील मॉन्सून लीग क्रिकेट स्पर्धेतील बी डिव्हिजनमधील सामन्यांत कृष्णा, ग्रिफीन, एसएसके व क्रीडक क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत विविध संघांकडून खेळाडूंची चमकदार कामगिरी केली आहे व अ गटातील कै. शिवाजीराव कातकाडे स्मृति चषक स्पर्धेत प्रवेश केला.
बी डिव्हिजनमध्ये एकूण १६ संघांत ४ गटात प्रत्येक संघाला मर्यादित २५ षटकांच्या स्वरूपात प्रत्येकी ३ साखळी सामने खेळविले. कृष्णा, ग्रिफीन, एएसके व क्रीडक क्रिकेट अकादमी या संघांनी आपले तिन्ही साखळी सामने जिंकले. यास्पर्धेत फलंदाजीत कृष्णा क्रिकेट अकादमीचा वेदांत गिरी, ग्रिफीनचा कृष्णा गोवर्धने, एसएसकेचा झुनेद अन्सारी यांनी शतके झळकवली. गोलंदाजीत कृष्णाचा तनिष्क खेडकर, क्रीडकचा चैतन्य बागूल व ग्रिफीनचा आदित्य विश्वकर्मा यांनी एका सामन्यात प्रत्येकी ५ बळी घेत विशेष चमक दाखवली. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, महात्मा नगर व एसएसके मैदान येथे हे सामने खेळवण्यात आले.