Traffic
sakal
पंचवटी: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मुख्य प्रवेशद्वारावर लागणाऱ्या वेळेमुळे बुधवारी (ता. २४) दुपारी अडीचच्या सुमारास दिंडोरी रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा प्रवेशद्वारापासून थेट दिंडोरी नाक्यापर्यंत लागल्या होत्या. ही कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाजार समितीकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत होते.