Ring Road
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती रिंगरोड (परिक्रमा मार्ग) उभारण्यात येणार आहे. या मार्गासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनीचे संपादन व मोजणीला नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने मान्यता दिली. कुंभमेळ्यापूर्वी हा मार्ग करण्यासाठी तातडीने कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.