Kumbh Mela
sakal
दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे. यंदाचा कुंभमेळ्यात त्रिखंडी योग जुळून आल्याने दोन वर्षे पर्वणीचा योग असणार आहे. तब्बल ७५ वर्षांनी जुळून आलेल्या या योगामुळे सिंहस्थाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, भाविक मोठ्या संख्येने गर्दी करणार आहेत. त्यामुळे नियोजनाचे आव्हान आहे. हाती कमी कालावधी अन् कामांची यादी मोठी, अशी अवस्था शासन-प्रशासनाची झाली आहे.