Kumbh Mela
sakal
नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सहा हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ गुरुवारी (ता. १३) होणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ३ डिसेंबरनंतर तेथील कामांचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.