Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा तयार करण्यात येत आहेत. विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात देत असून, कुंभमेळ्यासाठीची सर्व कामे विहित वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. साधुग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.