Devendra Fadnavis
sakal
नाशिक: पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरणदास महाराज यांच्या नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यातील कथित हस्तक्षेपाबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन दप्तरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधितांना चौकशीचे निर्देश दिल्याने धार्मिक आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.