Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने महापालिका व शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणारी सर्व कामे गुणवत्तापूर्ण व दीर्घकाळ टिकणारी होण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने कामे झाल्यानंतर ती कामे गुणवत्ता पूर्ण झाली की नाही यासंदर्भात तपासणी करण्यासाठी त्रयस्थ संस्थेची (थर्ड पार्टी) नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे चुकीच्या कामांचा उद्देश ठेवून नाशिकमध्ये एन्ट्री करणे व तीच कामे स्थानिक नगरसेवकांना उपकंत्राटदार नियुक्त करून करणाऱ्यांचे या निर्णयाने धाबे दणाणले आहेत.