नाशिक: आगामी कुंभमेळ्यासाठी तातडीने हाती घ्यावयाच्या कामांसाठी शासनाने मंजूर केलेल्या एकूण निधीपैकी महापालिकेचा वाटा किती? याबाबत अद्याप निश्चिती नसली तरी मागील कुंभमेळाप्रमाणे महापालिकेला २५ टक्के निधी खर्चाचा वाटा उचलावा लागेल, असा अंदाज गृहीत धरून पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या तीन हजार २७७ कोटींच्या निधीनुसार ८१९ कोटी रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत. खर्चाचा अंदाज लक्षात घेऊन महापालिकेने बाह्यस्रोतांद्वारे निधी उपलब्ध करण्यासाठी आता नव्याने कर्ज उचलण्याच्या धोरणात बदल केला आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे आता ४०० कोटींचे कर्ज उभारले जाणार आहे.