नाशिक: महापालिकेच्या शिक्षण विभाग व पोलिसांकडून सर्व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांमधून स्टुडंट कॅडेट प्रोग्रॉम व कुंभमेळा स्वयंसेवक उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.