Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी म्युनिसिपल बॉण्ड व हरित कर्जरोखे उभारताना एक हजार कोटींचे कर्ज देखील उभारणार असल्याने त्यातून अर्बन चॅलेंज फंड देखील उपलब्ध होणार आहे. पूर्वी शंभर कोटींचे उद्दिष्ट होते. पायाभूत सुविधांसाठी अधिक कर्ज घेतले जाणार असल्याने अर्बन चॅलेंज फंडदेखील वाढणार असून जवळपास २२५ कोटी रुपये महापालिकेला उपलब्ध होणार आहे.