Nashik Kumbh development projects
Sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना हवा तसा वेग येत नसल्याच्या तक्रारीवर गुरुवारी (ता. १३) रामबाण उपाय निघत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह डझनभर मंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिका हद्दीतील तीन हजार ३३१ कोटींच्या तब्बल २५ कामांचे उद्घाटन होईल. त्याचबरोबर भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे ठक्कर डोम येथे आयोजन करण्यात आले आहे.