Kumbh Mela
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात आपत्ती निवारणासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने २६४ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. जिल्हास्तरावरून आराखड्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिली आहे.