Girish Mahajan
sakal
नाशिक: नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २०१५ च्या तुलनेत चारपट गर्दी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जगाचे लक्ष लागलेल्या नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर अतिक्रमणमुक्त केले जात असल्याची माहिती कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.