नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकीकडे शासनाकडून निधी मंजूर होत नाही, तर दुसरीकडे महापालिकेला स्वनिधीतून वेळेत पूर्ण होऊ शकतात, असे कामे प्राधान्यक्रमाने सुरू करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे निधी उभारणीसाठी वित्त व लेखा विभागामार्फत तीनशे कोटींचे कर्ज काढले जाणार असून, त्यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून स्वारस्य देकार मागविले जाणार आहे.