Kumbh Mela Nashik police preparations
Sakal
नाशिक: अवघ्या दीड वर्षांवर आलेल्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी प्रशासन, राजकीय पक्ष आणि अधिकारी वारंवार बैठकांचे आयोजन करत आहेत. आता या बैठकीत पोलिस विभागाचीही भर पडली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या गुरुवारी (ता. २५) मुंबईत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेणार आहेत.