नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिकेच्या बांधकाम विभागाने नियोजन केलेल्या जवळपास २४७ किलोमीटर रस्त्यांच्या आणि त्या अनुषंगाने विकास आराखड्यात तरतूद केलेल्या निधीला कात्री लागणार आहे. तसेच शासनाकडून तातडीने निधी मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याने व सुसज्ज रस्ते तयार करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता महत्त्वाच्या रस्त्यांची विकासकामे रखडू शकतात.