Kumbh Mela
sakal
नाशिक: प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याचा दावा करताना त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. परिणामी नाशिक कुंभमेळ्यासाठी साधुग्रामच्या जागेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तब्बल एक हजार १५० एकर जागा घेतली जाणार असल्याने यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा थेट स्वामिनारायण मंदिर ते नांदूर गावाच्या शिवेपर्यंत पोचणार आहे.