Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील पर्वणीसाठी येण्याची शक्यता आहे. देशातील विविध भाषिक राज्यातून येणाऱ्या भाविकांशी संवादातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या ‘भाषिणी’ ॲपचा वापर नाशिक पोलिसांकडून करण्यात येणार आहे. यामुळे परप्रांतिय भाविकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणे सुलभ होणार आहे.