त्र्यंबकेश्वर- भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील गोदापात्रावर शासनाने १९५५ मध्ये प्रथम स्लॅब टाकून ते बंदिस्त केले. नंतर १९८० मध्ये काही भागात तर १९९१-९२ मध्ये पुन्हा स्लॅब काढून सिमेंट पाइप टाकून पाणी जाण्याची व्यवस्था केली. .आता पुन्हा हा स्लॅब, सिमेंट पाइप काढून बंदिस्त गोदापात्र खुले करण्याचा घाट घातला जात आहे. याला स्थानिक नागरिकांसह सिंहस्थ कुंभमेळा समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. आता पुन्हा त्याच त्या विषयावर हा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे..त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या गोदावरी पात्रावर प्रथम १९५५ मध्ये स्लॅब टाकण्यात आला, तेव्हा हा स्लॅब काही भागापुरताच मर्यादित होता. त्या वेळी लोकवस्ती विरळ होती. पुढे १९८० मध्ये काही भागात आणि १९९१-९२ च्या सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत स्लॅब काढून सिमेंट पाइप टाकून पाणी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. २००३-०४ मध्येही याच कालावधीत पुन्हा सिमेंट पाइपाऐवजी लोखंडी पाइप व स्लॅब अशी दुहेरी योजना राबविण्यात आली. प्रत्येक बारा वर्षांनी या गोदावरी पात्रात मोडतोड करून कोट्यवधी रुपये खर्ची घालण्यात आले. मात्र समस्या ‘जैसे थे’च आहे..सर्वसंमतीने निर्णय : महामंत्री हरिगिरीगोदावरी पात्रात वाहते पाणी आणणे व स्लॅब तोडणे असे तुघलक प्रयोग होऊ नयेत. नदीपात्रात स्वच्छ पाणी कुणास नको आहे. उघड्या अहिल्या गोदा संगमात रोजच मोठ्या प्रमाणात कचरा, प्लॅस्टिक व इतर टाकाऊ सामान पडते. ते काढायला पालिकेची दमछाक होते. तर या सर्व उघड्या पात्राची रोज काय अवस्था होईल हाही विचार करावयास हवा. विकास हवा परंतु त्रासदायक व नुकसानकारक नसावा अशी स्थानिकांनी मागणी केली आहे. जुन्या आखाड्याचे महामंत्री हरिगिरी यांच्याशी स्थानिक नागरिक, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, कुंभमेळा समितीचे अध्यक्ष सुरेश गंगापुत्र, निषाद चांदवडकर व लक्ष्मीकांत थेटे यांनी चर्चा केली. त्यावर महामंत्री हरिगिरी यांनी याबाबतीत सर्वांशी चर्चा करून व सर्वसंमतीने निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.यासाठी केली स्लॅबची व्यवस्थात्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री बारमाही भाविकांचा ओघ सुरू असततो. कुशावर्तावर कुंभमेळा कालावधीत साधू आखाड्यांच्या शाही स्नानाच्या पर्वण्या एक सांस्कृतिक व श्रद्धेचा हिंदू धर्मीयांचा आस्थेचा विषय आहे. त्यामुळे या कालावधीत सगळ्यांचे स्नान व दर्शनासाठी हा सोहळा पाहण्यासाठीचा खटाटोप सुरू असतो. लोकसंख्या वाढत गेली, तशी साधू आखाड्यांच्या लोकांची संख्याही वाढल्याने व सोयी-सुविधांचा प्रभाव असल्याने हा सोहळा आधुनिक व हायटेक असा साजरा होऊ लागला आहे. .हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ बघण्यासाठी भाविक आसुसले असतात. तो भाविकांना बघता यावा व मेन रोडवर जागा कमी असल्यामुळे गोदापात्रावर सिमेंट स्लॅब टाकला आहे. येथील वार्षिक यात्रा, श्रावणातील गर्दी तसेच महाशिवरात्रीला होणारी गर्दी यासाठी जागाच नसल्याने ही व्यवस्था शासनाने केली आहे..तेव्हाही नागरिकांना त्रासचयापूर्वी गर्दी कमी असताना साधू व भाविक या पात्रात पडल्याचेही सांगितले जाते. या पात्रात १९९० पर्यंत दगडी सुंदर भक्कम पायऱ्या होत्या, त्या तोडून हा सिमेंट स्लॅब उभारला. त्या वेळी विरोध करणाऱ्या नागरिकांना रोषाला सामोरे जावे लागले. परंतु शासनाच्या हट्टापुढे विरोध निरर्थक ठरला. आत्ता पुन्हा त्याचसाठी भांडत बसून तोच परिपाठ सुरू ठेवायचा का, हा प्रश्न आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.