अतिगर्दी अन्‌ चेंगराचेंगरीला बसणार वेसन!

अतिगर्दी अन्‌ चेंगराचेंगरीला बसणार वेसन!
Published on: 
एन्कर ---------------------- अतिगर्दी, चेंगराचेंगरी रोखण्यास सूक्ष्म आराखडा ---------- कुंभमेळ्यादरम्यान सीसीटीव्ही, एआय अन्‌ ड्रोनद्वारे पोलिसांची निगराणी ----------- नरेश हाळणोर : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान कोट्यवधी भाविकांची सुरक्षा आणि संभाव्य अपघात, तसेच चेंगराचेंगरीसारख्या आपत्कालीन घटना रोखण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाने सूक्ष्म नियोजन करत व्यापक उपाययोजना केल्या आहेत. व्ही. रमणी आयोगाच्या शिफारशी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (एनडीएमए) मार्गदर्शक तत्त्वे आणि अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा मेळ घालून पोलिस आयुक्तालयाने विशेष गर्दी व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. यामुळे गर्दी अन्‌ चेंगराचेंगरीसारख्या घटनांना रोखता येणे शक्य होईल. २७ ऑगस्ट २००३ ला चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेच्या अभ्यासावरून अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. .... २०-२ गर्दीची घनता अन् धोक्याची सूचना -​ कुंभमेळा काळात गर्दी नियंत्रणासाठी प्रतिचौरस मीटर भाविकांच्या संख्येनुसार धोक्याची पातळी निश्चित - सुरक्षित पातळी (२ व्यक्ती/ चौ. मी.) : भाविकांची हालचाल सुलभ व सुरक्षित राहील. - ​नियंत्रित पातळी (३ व्यक्ती/ चौ. मी.) : गर्दी जास्त असली, तरी प्रवाहाचा ‘उलटा मार्ग’ नसणे बंधनकारक आहे. -​ असुरक्षित पातळी (४ व्यक्ती/ चौ. मी.) : भाविकांचे स्वतःवरील नियंत्रण सुटून अनैच्छिक ढकलाढकली सुरू होते. -​ धोकादायक पातळी (५ किंवा अधिक व्यक्ती/ चौ. मी.) : ही अत्यंत धोकादायक स्थिती असून, आतापर्यंतच्या बहुतेक प्राणघातक चेंगराचेंगरीच्या घटना याच स्तरावर झाल्याचे निरीक्षणात आले आहे. ---------------- २०-२ व्ही. रमणी आयोगाच्या पाच प्रमुख शिफारशी ​१. गर्दीच्या ठिकाणी ‘उलटा प्रवाह’ हा सर्वांत घातक ठरत असल्याने कडक एकमार्गी पादचारी मार्ग अमलात आणले जातील. २. गर्दी मुख्य ठिकाणी किंवा अरुंद रस्त्यावर पोहोचण्यापूर्वीच बाहेरून नियंत्रित केली जाईल. ३. आखाडे, स्थानिक भाविक आणि बाहेरून येणारे नागरिक यांच्या वेळेत विभाजन, जेणेकरून गर्दी एकमेकांत मिसळणार नाही. ४. ऐनवेळी त्वरित निर्णय घेण्यासाठी घटनास्थळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण राहील. ५. अतिगर्दीच्या पादचारी मार्गांवर वाहने, मिरवणुका किंवा इतर कोणत्याही अडथळ्यांना पूर्णपणे बंदी असेल. ------------------ १६-१ सुरक्षिततेचे त्रिस्तरीय नियोजन *घाटांची क्षमता निश्चित करून प्रवेश व निर्गमनाचे वन-वे रूट तयार केले आहेत. अरुंद रस्ते, पूल व वळणांवर ‘बॉटलनेक’ नोंदवून योग्य अंतरावर बॅरिकेडिंग केले जाईल. * महिला, बालके व वृद्धांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित पोलिसांची ‘मानवी साखळी’ तयार केली जाईल. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी मेडिकल पॉइंट्स, रुग्णवाहिका आणि होमगार्डस/स्वयंसेवक तैनात राहतील. * सीसीटीव्ही व ड्रोनच्या सहाय्याने गर्दीच्या घनतेचे ‘लाइव्ह मॉनिटरिंग’ केले जाईल. गर्दीची घनता अचानक वाढल्यास ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे त्वरित धोक्याचा इशारा मिळेल. तसेच, अफवा रोखण्यासाठी ध्वनिवर्धकावरून सातत्याने अधिकृत सूचना दिल्या जातील. --- कोट (फोटो वापरावा) सिंहस्थ काळात अत्याधुनिक ‘एआय’ बेस सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. यामुळे गर्दीची आगाऊ सूचना पोलिस नियंत्रण कक्षाला मिळेल. परिणामी, मागून येणारा गर्दीचा लोंढा राखून गर्दी नियंत्रणात आणता येणार आहे. गोदाघाट, घाट मार्ग, शाही मार्ग या सर्व ठिकाणी या आधारे निगराणी ठेवता येईल. - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com