Girish Mahajan
sakal
नाशिक: कुंभमेळ्याची व पर्यायाने नाशिकची विनाकारण बदनामी होईल असे कुणी बोलू नका, सोशल मीडियावर तसा प्रचार-प्रसार करू नका, मी लागेल तेवढी झाडे लावेल, अगदी नाशिककरांचे समाधान होईपर्यंत झाडे लावू; परंतु चुकीची माहिती पसरवू नका. आम्ही सहिष्णू आहोत, म्हणून काहीही ऐकणार नाही, असा इशारा देत ‘साधू गांजा प्यायला येतात, कुंभमेळा होऊ देणार नाही’ हे बोलणेही खपवून घेणार नाही, असे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन म्हणाले.