Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावरून सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षावरून शासनाने मंत्री समिती गठित केली आहे. समितीत तिन्ही पक्षांच्या दोन मंत्र्यांचा समावेश करताना समान न्याय देण्यात आला. पण समितीचे प्रमुखपद जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले. समितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाजन यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन वाढले आहे.