नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने जवळपास १५ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. अद्याप शासनाने त्यावर निर्णय घेतला नाही; परंतु दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन हजार २७४ कोटी रुपये रस्ते कामाची निविदा काढल्याने महापालिकेला कामांसाठी निधी मिळणार आहे की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.