Mahant Harigiri Maharaj
sakal
नाशिक
Mahant Harigiri Maharaj : महंत हरिगिरी महाराज यांनी वृक्षतोड प्रकरणी सुचविला उपाय
Mahant Harigiri Stresses Sustainable Development for Kumbh Mela : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री आणि श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे संरक्षक महंत हरिगिरी महाराज यांनी गोदावरीचे दर्शन घेतल्यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. तपोवनातील झाडे तोडल्यास त्याबदल्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
किरण कवडे- निसर्गाची हानी होणार नाही, असा शाश्वत विकास व्हावा, ही सर्वांची इच्छा आहे आणि त्याविषयी दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण, त्याला पर्याय म्हणून उपयोगी ठरणाऱ्या मार्गांचा विचार झाला पाहिजे. तपोनवातील १८४५ झाडे कुंभमेळ्यासाठी तोडली जाणार असतील तर आपण त्याबदल्यात १८ लाख झाडे लावून निसर्ग आणि नदीचे संवर्धन करू, असा विश्वास अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये व्यक्त केला. महाराज श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे संरक्षक आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १०) त्यांनी गोदावरीचे दर्शन घेतले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...
