Girish Mahajan
sakal
नाशिक: कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी अखेर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी करत शेतकऱ्यांनी जागेचा व घरांचा मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, मुख्य रस्त्याच्या मध्यभागापासून ५० मीटर किंवा २५ मीटर जागा मोकळी करायची, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (ता. ६) घेणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.