Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी त्र्यंबक रोडवर खादी ग्रामोद्योगच्या जागेवर टेंट सिटी प्रस्तावित आहे. त्र्यंबकेश्वर शहरावरील भार कमी करण्यासाठी जव्हार-मोखाडा व सापुतारा भागात तात्पुरत्या टेंट सिटी उभारण्याबाबत चाचपणी करावी, अशा सूचना राज्याच्या पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांनी केल्या आहेत. समृद्धी महामार्गाच्या बाजूनेही टेंट सिटीकरिता प्रयत्न करावे, असेही निर्देश यंत्रणांना देण्यात आले.