Road Development
sakal
नाशिक: दहा वर्षांपूर्वी १८८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ४६८ कोटी रुपये खर्च झाला असताना आगामी कुंभमेळ्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या रस्ते व पुलांच्या बजेटवर २,२९१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तब्बल पाचपट खर्च होणार असल्याने कुंभमेळा गिरीश महाजन यांनी आश्चर्य व्यक्त करत रस्ते विकास महामंडळ व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. मंत्री महाजन मुंबईत पोचत नाही, तोच २५ अधिकाऱ्यांचे पथक महापालिका मुख्यालयात दाखल झाले.