road tender
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने ९३० कोटींच्या रस्ते कामाची एकत्रित निविदा (क्लब टेंडरींग) काढण्यात आली. परंतु, रस्त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करताना अनेक ठिकाणचे गरजेचे रस्ते वगळण्यात आले आहे. मुख्यत्वे रिंगरोड विकासाला प्राधान्य देण्यात आले असले तरी सुला वाइन, रविशंकर मार्गावरील रस्ते विकसित करताना जमिनींचे भाव वाढविण्यासाठी रस्ते विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचा आरोप देखील केला जात आहे.