Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी मोठा निधी! १,२२८ कोटींच्या रस्तेकामांना प्रशासकीय मंजुरी; दुसऱ्या टप्प्यात २९८ कोटींचे ९ रस्ते
Nashik Kumbh Mela Road Works Accelerate with Phase 2 Approval : नाशिक महापालिकेच्या हद्दीतील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पहिल्या टप्प्यात ९३० कोटींनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील २९८.५५ कोटी रुपयांच्या ९ रस्तेकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे एकूण ₹१,२२८ कोटींच्या कामांना हिरवा कंदील मिळाला असला तरी, महापालिकेच्या ₹२०३८ कोटींच्या मूळ प्रस्तावातील ८४० कोटी रुपयांच्या कामांना कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका हद्दीत ९३० कोटी रुपये किमतीच्या २१ रस्तेकामांना मंजुरी मिळाल्यावर आता सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने दुसऱ्या टप्प्यातील २९८. ५५ कोटींच्या रस्तेकामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.