Environmental
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यातील एकूण कामांपैकी सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या साधुग्राम उभारणीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने १ हजार ८२५ झाडांवर रेखांकन करताना हरकती मागविल्याने संतापलेल्या पर्यावरण प्रेमींनी २५० हरकतींचा मारा केल्यानंतर महापालिका प्रशासन बॅकफुटवर आले आहे. आता फक्त दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेले, बांधकामे बाधित होणारी वृक्ष तोडली जाणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान उद्यान विभागाचे २५० हरकती प्राप्त झाल्या असून सोमवारी (ता. २४) हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे.