Nashik police
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने संदेशवहन क्षमता जलदगतीने व सुरक्षितरीत्या होण्यासाठी पोलिस विभागाने सातपूर विभागात उंचावर असलेल्या फाशीच्या डोंगराची निवड केली आहे. डोंगरावर ०.१८ एकर जागेची मागणी महापालिकेच्या मिळकत विभागाकडे केली आहे. महासभेत प्रस्ताव मंजुरीनंतर पोलिसांकडून या जागेवर कामाला सुरवात केली जाणार आहे.