Kumbh Mela
sakal
पंचवटी: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने तपोवन परिसरातील मठ व मंदिरांना आरक्षणासंदर्भात बजावलेल्या नोटिसांमुळे साधू-संतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही बाब लक्ष्मीनारायण बडा मंदिराचे महंत रामस्नेहीदास महाराज यांनी दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री श्री महंत बलरामदासजी महाराज यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. या प्रकरणावर तीनही अनी आखाड्यांचे प्रमुख महंत एकत्रित चर्चा करून तोडगा काढणार असून, आवश्यकता भासल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.