नाशिक: नाशिकमध्ये कुंभमेळ्यानिमित्त पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, यासाठी ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सदैव तयार आहे. यासाठी प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद द्यावा. आपल्या घरी कोणी येणार असेल तर आपण घर व्यवस्थित व नीटनेटके ठेवतो, त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने शहराचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून नाशिकबद्दल भाविक व पर्यटकांना कायम आकर्षण राहील. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून भविष्यातही नाशिकनगरीचा निश्चितच सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन ‘तान’च्या पदाधिकाऱ्यांनी केले.