मालेगाव: शहरात कुत्ता गोळी, कोरेक्स, गांजा, एमडी पावडर या अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी मालेगाव परिमंडळात २०२२ पासून ते जुलै २०२५ या साडेतीन वर्षांत १०९ गुन्हे दाखल झाले आहेत. २०४ आरोपी या गुन्ह्यात सहभागी असून, त्यांच्याकडून पोलिसांनी पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.