Latest Marathi News | मागणी नसल्याने ‘पिवळे सोने’ मातीमोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marigold flower news

Nashik : मागणी नसल्याने ‘पिवळे सोने’ मातीमोल

नाशिक : सध्या पितृपक्ष चालू असल्याने फुलांना फारशी मागणी नाही. त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना मातीमोल भावात फुले विकण्याची वेळ आहे. एरवी दीडशे ते दोनशे रूपयांत मिळणाऱ्या झेंडूची क्रेट अवघ्या पन्नास साठ रूपयांत विकावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे श्री गणरायाच्या आगमनानंतर सर्वच प्रकारच्या फुलांना चांगली मागणी होती, परंतु त्यानंतरही सुरू असलेली पावसाची रिपरिप व पितृपक्ष यामुळे फुलांच्या मागणीत मोठी घसरण झाली आहे. (lack of demand Marigold in festival season nashik Latest Marathi News)

हेही वाचा: ग्रामीण भागात पुन्हा ‘चुली’वर स्वयंपाक; का ते जाणुन घ्या...

त्यामुळे झेंडू, गुलाब, लिली,अस्टर, गुलछडी अशा कोणत्याच फुलांना फारशी मागणी नाही. त्यामुळे सर्वच प्रकारची फुले मातीमोल भावात विकावी लागत असल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. एकीकडे रोगापासून फुलांचे संरक्षण होण्यासाठी महागडी खते वापरावी लागत असतानाच फुलांना भाव नसल्याने फूल उत्पादक शेतकरी त्रस्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने इतर पिकांसारखेच फूल शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच पितृपक्षात फुलांना मागणी नसल्याने भावात मोठी घसरण झाली आहे.

मात्र आता येत्या २६ सप्टेंबरच्या घटस्थापनेनंतर फुलांच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता बळीराजाने गृहित धरली आहे. नवरात्रात थेट दसऱ्यापर्यंत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर खतांचा वापर करत फुलशेती वाचविण्याच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचा: Sakal Exclusive : वन्यजीव अवयव विक्रीचे नाशिक बनले केंद्र; 8 महिन्यात 6 घटना

Web Title: Lack Of Demand Marigold In Festival Season Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..