नाशिक- कुस्ती खेळाला मोठी परंपरा आहे. अगदी पौराणिक काळातही कुस्तीचा उल्लेख आहे. मात्र, सद्यःस्थितीत कुस्ती व पहिलवानांना संघर्ष करावा लागत आहे. सामाजिक, शासकीय व आर्थिक या सर्वच बाबींवर पहिलवानांना पाठबळाची आवश्यकता आहे..शासनाने जशी लाडकी बहीण योजना राबविली, त्याचप्रमाणे ‘लाडका-लाडकी’ खेळाडू योजना राबवावी, अशी एकमुखी मागणी कुस्ती संघटनेच्या पदाधिकारी व पहिलवानांनी केली. हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवारी (ता. १२) ‘सकाळ’ सातपूर कार्यालयाला त्यांनी भेट दिली. या वेळी ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर व महाव्यवस्थापक संजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले..किट नको, कोच द्या अनेक स्वयंसेवी संस्था व मोठ्या कंपन्यांकडून मुला-मुलींना उपयोगी असे किटचे वाटप होत असते. या मागील त्यांचा उद्देश अतिशय योग्य आहे. मात्रस किट देण्यापेक्षा जर कुस्तीसाठी कोच दिला तर त्या माध्यमातून निश्चितच देणाऱ्यांचा उद्देश अधिक जास्त प्रमाणात सफल होईल, अशी भावना या वेळी पहिलवानांनी व्यक्त केली..मुली कुस्ती मुलांबरोबर खेळण्यासाठी सुद्धा तयार आहेत. मात्र त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित आहे. एकाच खेळात मुलांना अधिक व मुलींना कमी पैसे दिले जातात, या प्रकारच्या मानसिकतेमुळे मुलींची खेळातील प्रगती खुंटते.- समीक्षा पवार.खेळाडू कोट्यातून महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळण्यासाठी अडचणी आहेत. त्यासाठीची पूर्तता करण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. मला नोकरी मिळवताना हाच अनुभव आला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये खेळाडूंना कमी सुख-सुविधा आहेत.- संदीप शहाणे.स्थानिक स्वराज्य संस्था विशेष करून महापालिकेकडून कुस्ती या खेळासाठी पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे. पूर्वी महापौर केसरी स्पर्धा आयोजित केली जात. अनेक वर्षांपासून ती बंद आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून निवासी तालीम इमारत शहर व जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी उभारली जावी. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ५ टक्के खेळाडूंसाठी आरक्षण आहे. मात्र त्याचे पालन होत नाही.- संजय चव्हाण, अध्यक्ष, शहर कुस्ती संघटना.या खेळामध्ये मुलींची संख्या कमी आहे. मात्र त्यांच्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्याची क्षमता आहे. शासकीय पातळीवर पाठबळ मिळणे आवश्यक आहे. या क्षेत्राला करिअर म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. इतर खेळांच्या तुलनेत कुस्तीला प्रेक्षकवर्ग कमी आहे. - संस्कृती शिरसाठ.शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची भरती शासनाने बंद केली आहे. त्यामुळे खेळाडू तयार होत नाही. सरकारकडून कुस्तीचा प्रचार व प्रसारासाठी अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. मोठ्या आस्थापनामधून पैलवानांचे संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत असे आता ते पूर्णपणे बंद झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन नियमितपणे केले जावे. - गोरख बलकवडे, सचिव, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद.नाशिकच्या मुलींमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याची क्षमता आहे. आपल्याकडे जवळपास ५० मुली चांगल्या दर्जाच्या पैलवान आहेत. मुंबई, पुण्यामध्ये प्रत्येक तालमीत तितक्या मुली असतात. मुंबई, पुण्यात कुस्ती एक लाखाची होत. आपल्याकडे मात्र पाचशे रुपयालाही प्रतिसाद मिळत नाही.- योगेश शिरसाठ. मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत. त्याही कुस्तीचे मैदान गाजवत आहेत. त्यांना सर्व स्तरातून पाठबळ मिळणे आवश्यक आहे. या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने बघून यात करिअर होऊ शकते हा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. तरच कुस्तीला चांगले दिवस येतील व नवतरुण या क्षेत्राकडे आकर्षित होतील.- नीलम शिरसाठ.‘उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशामध्ये डुप्लिकेट पैलवानांचे पीक आले आहे. ते पैलवान आपल्याकडे येऊन पैसे कमवून जातात, मात्र आपल्या स्थानिकांना आर्थिक पाठबळ मिळत नाही. आर्थिक परिस्थितीमुळे पैलवानांना खुराक योग्यरीत्या घेता येत नाही.- सर्जेराव वाघ .हरियाना राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंना एक कोटी रुपयांपर्यंतची बक्षीसे दिली जातात. महाराष्ट्रामध्ये असे घडत नाही.त्यामुळे खेळाडूंना नाइलाजाने विशिष्ट कालावधीनंतर कुस्ती सोडून द्यावी लागते.- हिरामण वाघ.अजूनही मुलींना दुय्यम स्थान दिले जाते. मुला- मुलींमध्ये कुस्ती या खेळ प्रकारातही भेदभाव केला जातो. एखादी, दुसरी स्पर्धा जिंकल्यानंतर आता बस झाले असे सांगितलं जाते. मात्र मुलांसाठी तो निकष नसतो. खरंतर मुलींनाही पूर्ण स्वातंत्र्य कुस्तीसाठी दिले पाहिजे. - नारायणी जोशी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.