

Ladki Bahin Yojana
esakal
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये झालेल्या सभेत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या या सभेत त्यांनी सरकारच्या योजना आणि विकासकामांवर प्रश्न उपस्थित केले. विशेषतः महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या १५०० रुपयांच्या रकमेचे गणित मांडत ते म्हणाले की, वाढत्या महागाईत ही रक्कम केवळ १५ दिवस पुरते. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे, अशा परिस्थितीत महिलांना मिळणारे हे पैसे कसे पुरेशे ठरू शकतात? सरकार जाती आणि धर्माच्या आधारावर लोकांना फसवून मते मागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.