लखमापूर: येथील भरत दौलत मोगल यांच्या पोल्ट्री शेडवर रात्री दोनच्या सुमारास एका मादी व नर बिबट्या मस्ती करत असताना त्यांच्या वजनाने तो तुटला व दोन्हीही बिबटे पोल्ट्रीत पडले. शेजारील जनावरे ओरडायला लागल्यानंतर घरातील माणसांनी जनावराकडे बघितले असता, त्यांना पोल्ट्रीत बसलेले बिबटे दिसून आले. त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती कळविली. मात्र, तब्बल दोन तासांनंतर फॉरेस्ट अधिकारी घटनास्थळी आले.