Nashik Crime News : घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

burglary News
burglary Newsesakal

नाशिक : शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पहिली घटना सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. (lakhs of rupees stolen in house burglary Nashik Latest Crime News)

burglary News
Nashik : मध्यरात्रीस मद्यधुंद चालकाचे 'Hit & Run'; 10 जण जखमी

जुना गंगापूर नाका परिसरात असलेल्या शारदा को- ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये राहत असलेल्या दिलीप बोरस्ते यांच्या बंद बंगल्याच्या खिडक्यांचे गज कापून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला व घरातील चांदीचा तांब्या, महागडी म्युझिक सिस्टीम, ५० हजारांची रोकड, अडीच हजार रुपयांची नाणी, समई, करंडा, चांदीचे क्वॉईन, असा सुमारे एक लाख २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दुसरी घटना पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दिंडोरी रोडवरील गुलमोहर कॉलनीत राहत असलेल्या सौरभ जैन यांच्या बंद घराचा लॅच तोडून घरातील बेडरुममध्ये असलेल्या कपाटामधून रोख पाच लाख ९१ हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने, असा सुमारे सहा लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

burglary News
Nashik : घंटागाडीच्या कचऱ्यात आढळली ‘नकोशी’!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com