Saptashrungi
sakal
वणी: ‘पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो... अर्ध्यपाद्य पूजने तुजला भवानी स्तविती हो...’ या आरतीच्या स्वरांनी शुक्रवारी (ता. २६) सप्तशृंगगड दुमदुमून गेला. नवरात्रोत्सवातील पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत साजरे करण्यात आले. तिथीनुसार दोन दिवस पंचमी मानली जाणार असल्याने गडावर भाविकांच्या गर्दीत लक्षणीय वाढ झाली.