नाशिक- बनावट दस्तावेज तयार करून जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने संशयित नीता संजय खानकरी हिला एक वर्षाच्या साध्या कारावासाची व १६ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सदर शिक्षेची अंमलबजावणी ३० दिवसांच्या मुदतीत करण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.