बनावट कागदपत्रांद्वारे मेहरुणमधील जमीन हडपली

बनावट कागदपत्रांद्वारे मेहरुणमधील जमीन हडपली
Published on: 
बनावट कागदपत्रांद्वारे जमीन हडपली नावातील साधर्म्याचा गैरफायदा; खरेदीदारांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे तयार करून मेहरुण शिवारातील २९०.३१ चौरस मीटर जागा परस्पर हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २७ ऑगस्ट २०२४ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील खरेदीदार व साक्षीदारांसह सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधीनगर येथील विलास श्यामराव कुमावत (वय ६१) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मेहरुण शिवारातील सर्व्हे क्रमांक १६ मधील भूखंड क्रमांक एकमधील संबंधित जागा त्यांची आई धुपदाबाई श्यामराव मिस्त्री (कुमावत) आणि आत्या सुंदराबाई तानाजी मिस्त्री (कुमावत) यांच्या मालकीची होती. आत्याने नंतर ही जागा धुपदाबाई यांच्या नावावर केली होती. कोरोना काळात धुपदाबाई यांचे निधन झाले; मात्र सातबाऱ्यावर वारसांची नोंद झाली नव्हती. दरम्यान, ही जागा विजया नरेश क्षत्रीय यांच्या मालकीची असल्याची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कुमावत यांना संशय आला. खरेदी व्यवहारातील कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. चौकट न्यायालयीन आदेशानंतर फिर्याद दाखल न्यायालयाच्या आदेशानंतर १८ नोव्हेंबरला फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरून संशयित सुंदराबाई मिस्त्री, धुपदाबाई मिस्त्री, विजया क्षत्रीय, प्रमोद निरंजन भट्टा, सफुद्दीन तहेभाई बोहरा आणि मिलिंद एकनाथ निकम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक फौजदार दीपक शिरसाठ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.